

आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या पुढाकाराने पांढुर्ली येथे विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी
सिन्नर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांढुर्ली, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या रक्तगटाची माहिती असावी, या उद्देशाने आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी शिबिर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.
