
आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्ट, ठाणे आणि सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळनारे येथे मोफत महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न!
१६८ विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी व रक्तगट तपासणी; मंडला कला प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन
पिंपळनारे, ता. दिंडोरी, जि. नाशिक, दि. २२ ऑक्टोबर २०२६ :समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि आजारांचे वेळेवर निदान व्हावे, या सामाजिक उद्देशाने आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्ट, ठाणे आणि सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, पिंपळनारे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये एकूण १६८ शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी व रक्तगट तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, एकाग्रता वाढावी आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी मोफत मंडला कला प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. आरोग्य, शिक्षण आणि कला यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधण्यात आला.
