आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्टचा के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालयाशी सामंजस्य करार.

सिन्नरमध्ये ‘विद्यार्थी–माता पालक मेळावा – २०२६’ उत्साहात संपन्न.
October 17, 2026
महाराष्ट्र अभियंता प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक मध्ये थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र जागृती मोहिमेस प्रारंभ-प्रा. प्रकाश पांगम
October 17, 2026

विश्वस्त .डॉ. दिपक मोरेश्वर नाईक यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेत आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्टचा के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालयाशी सामंजस्य करार.

नाशिक : समाजसेवा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट हे संस्थेचे मुख्य विश्वस्त संस्थापक विश्वस्त डॉ. दीपक मोरेश्वर नाईक यांच्या प्रेरणेतून सुरू असलेले समाजहिताचे कार्य अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने विविध शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करत आहे. त्यांनी सुरू केलेल्या ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियानासह आरोग्य जनजागृती, मोफत आरोग्य तपासणी, व्याख्याने, कार्यशाळा आणि विद्यार्थी जनजागृतीचे अनेक उपक्रम राज्यभर राबविण्यात आले असून, हीच समाजसेवेची परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याचा ट्रस्टने संकल्प केला आहे.याच अनुषंगाने दिनांक १६.७.२०२६ रोजी आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट आणि के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालय, नाशिक यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात
आला.

Comments are closed.