

विकसित भारतासाठी सुदृढ युवक घडविण्यात माता-पालकांची भूमिका अनमोल डॉ. सोनल काठोळे.
सिन्नर | प्रतिनिधी – मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित जी. एम. डी. आर्ट्स, बी. डब्ल्यू. कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सिन्नर येथे राष्ट्रीय छात्र सेना (NCC), पोलीस पूर्व-भरती प्रशिक्षण अकॅडमी (Career Katta), अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC), मानसशास्त्र विभाग तसेच आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्ट, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने “विद्यार्थी–माता पालक मेळावा – जुलै २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
