राष्ट्रीय डॉक्टर्स दिनी ३२४ शिक्षक – कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी.

‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियानाला नवी दिशा.
October 9, 2026
सिन्नरमध्ये ‘विद्यार्थी–माता पालक मेळावा – २०२६’ उत्साहात संपन्न.
October 17, 2026

आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्ट आणि के. के. वाघ महाविद्यालयाचा आरोग्यदायी उपक्रम.

नाशिक, प्रतिनिधी : समाजामध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्ट, ठाणे आणि के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त भव्य नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.  या शिबिरात विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वेट स्वीपर, माळी, वॉचमन आणि कॅन्टीन कर्मचारी अशा तब्बल ३२४ जणांनी सहभाग घेत मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

Comments are closed.