

के.के. वाघ महाविद्यालयात ७० शिक्षक-कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी; ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियानाला नवी दिशा.
आश्रय ट्रस्टच्या पुढाकारातून आरोग्य संवर्धन व थॅलेसेमिया-ॲनिमिया जनजागृतीचा दुहेरी उपक्रम
नाशिक, प्रतिनिधी : राज्यात ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ घडविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्ट, ठाणे आणि के.के. वाघ वरिष्ठ महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ जून २०२६ रोजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत एकूण ७० शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तपासणीचा लाभ घेतला.शिबिरात सीबीसी (CBC) चाचणी मोफत करण्यात आली. तसेच थॅलेसेमिया, ॲनिमिया, रक्त तपासणी आणि इतर आवश्यक आरोग्य चाचण्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
