

‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियानाला नाशिकमध्ये बळ; के. के. वाघ महाविद्यालयात जनजागृती कार्यशाळा, राज्यस्तरीय उपक्रमांची घोषणा.
आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्टच्या पुढाकारातून थॅलेसेमिया, ॲनिमिया व पोषण जनजागृतीसाठी व्यापक अभियानाची सुरुवात.
नाशिक, प्रतिनिधी : राज्यात ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ घडविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्टच्या जनजागृती अभियानाला नाशिकमध्ये नवे बळ मिळाले आहे. दिनांक २३ जून २०२६ रोजी के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय, सरस्वती नगर, नाशिक आणि आश्रय ट्रस्ट, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘थॅलेसेमिया, ॲनिमिया आणि न्यूट्रिशन जनजागृती’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
