

के.के. वाघ वरिष्ठ महाविद्यालयात ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियानाबाबत सकारात्मक चर्चा; आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्टच्या उपक्रमांना चालना.
नाशिक, प्रतिनिधी : राज्यात ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ घडविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्ट आणि के.के.वाघ वरिष्ठ महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७.६.२०२६ रोजी आगामी शैक्षणिक वर्षात विविध आरोग्य व जनजागृतीपर उपक्रम राबविण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
