

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट, एक्टिव महिला मंडळ व अबोली ग्रुप तर्फे आयोजित विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.
नाशिक – आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट यांच्या सहकार्याने एक्टिव महिला मंडळ आणि अबोली ग्रुप तर्फे आयोजित विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रम दिनांक १७ मे २०२६ रोजी रोजी अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला.आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एक्टिव महिला मंडळाच्या फाउंडर लतिका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दीपाली वाघ (अबोली ग्रुप लीडर), ज्योती भटकर आणि सर्व सक्रिय सदस्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.
