

वडनेर भैरव – म. विप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वडनेर भैरव येथील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने आश्रय ट्रस्ट थॅलेसेमिया जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात थॅलेसेमिया या गंभीर पण प्रतिबंधात्मक आजारासह, नियमित आणि संतुलित आहाराचे महत्त्व, चहाचे तोटे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये आयर्न कमतरतेची कारणे यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले
