

मुंबई, दि. १ ऑगस्ट २०२५ – थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र हे ध्येय गाठण्यासाठी आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आज पूर्ण करण्यात आला. दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी आश्रय ट्रस्टच्या भाईंदर (पुर्व), जि. ठाणे येथील मुख्य कार्यालयात झालेल्या विशेष सभेमध्ये नाशिक कमिटी, पुणे कमिटी आणि मुंबई कमिटी यांची अधिकृत स्थापना करण्यात आली. या बैठकीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मौलिक विचार मांडले. थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराबाबत जनजागृती, निदान व प्रतिबंधात्मक उपाययोजना या सर्व बाबींवर सखोल चर्चा झाली. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर प्रभावी कामकाज सुरू व्हावे, यासाठी समित्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
या सभेचे मुख्य आकर्षण म्हणजे आश्रय ट्रस्टचे मार्गदर्शक व थॅलेसेमिया जनजागृती मोहिमेचे पितामह प्रा. प्रकाश पांगम यांच्या शुभहस्ते नवीन जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
