

आझाद युवक मंडळ ,आश्रय सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक ट्रस्ट व समता संस्कार सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या वतीने भव्य दिव्य मोफत आरोग्य शिबीर व नेत्र चिकीत्सा पुणे हडफसर येथे संपन्न .
पुणे – दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे हडपसर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे शेकडो नागरिकांना थेट लाभ झाला असून, परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.आजाद युवक मंडळाचे यंदा ३३ वे वर्ष असून, समाजसेवेचे विचार युवकांमध्ये रुजावेत, हीच भावना त्यांच्या कार्यातून जाणवत होती. “समाजसेवा हीच खरी सेवा” हे ब्रीद पुन्हा अधोरेखित करत मंडळाने आदर्श निर्माण केला.
