

आश्रय ट्रस्टचे मुख्य विश्वस्थ स्व. डॉ. दिपक मोरेश्वर नाईक यांच्या शोकसभेचे नाशिक येथे आयोजन (दि. ०७ फेब्रुवारी २०२६)
आश्रय ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिपक मोरेश्वर नाईक यांचे 30 डिसेंबर 2025 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून या दुःखद् निधनाने संपूर्ण आश्रय ट्रस्ट परिवार भाऊक झालेला आहे. दीपक सरांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी नाशिकमध्ये आश्रय ट्रस्ट तसेच जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभेचे जनकल्याण रक्तपेढी मध्ये आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेमध्ये डॉ. दिपक मोरेश्वर नाईक यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
