

आगास खिंड शाळेत १२० विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी.
सिन्नर : दिनांक १७.०९.२०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा, आगास खिंड, सिन्नर येथे आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्ट आणि ए.के. डायग्नोस्टिक सेंटर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १२० विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि आरोग्यविषयक जनजागृती या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तगटाची नोंद विद्यार्थ्यांना भविष्यातील आरोग्यविषयक गरजांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.
