

आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या सहकार्याने JIT महाविद्यालयात सामाजिक उपक्रमांचा संगम
६७ जणांचे रक्तदान; २५१ व्यक्तींनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ
नाशिक | १५ ऑक्टोबर २०२६ जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अँड रिसर्च (JIT), नाशिक येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने मंडला आर्ट, थॅलेसेमिया जनजागृती, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या उपक्रमात ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर २५१ व्यक्तींनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
