आश्रय ट्रस्टच्या सहकार्याने मंडाला आर्ट कार्यशाळा उत्साहात संपन्न; २०० विद्याथ्यांचा सहभाग

आश्रय ट्रस्टच्या पुढाकाराने ऍनिमिया जनजागृती व नशामुक्ती अभियान
October 19, 2026
आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या सहकार्याने JIT महाविद्यालयात सामाजिक उपक्रमांचा संगम
October 19, 2026

आश्रय ट्रस्टच्या सहकार्याने मंडाला आर्ट कार्यशाळा उत्साहात संपन्न; २०० विद्याथ्यांचा सहभाग

देवळाली कॅम्प, दि. १० ऑक्टोबर २०२६ : विद्याथ्यांच्या सुप्त कलागुणांना बाब देऊन त्यांच्यात एकाग्रता, संयम आणि सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने पीएमश्री कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, देवळाली कॅम्प येथे दि. ९ व १० ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय मंडाला आर्ट कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत इयत्ता नववी व दहावीचे एकूण २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमात आश्रय सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक ट्रस्टचा महत्त्वपूर्ण सहभाग आणि योगदान अधोरेखित झाले.प्रा. प्रकाश पंगाम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनया कार्यशाळेचे मार्गदर्शक आणि आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टचेआरोग्य विभाग सचिव प्रा. प्रकाश पंगाम यांनी विद्यार्थ्यांना मंडाला कलेची संकल्पना, विविध आकृतिबंध, रेषा, आकार आणिरंगसंगती यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना मंडाला चित्रनिर्मितीचे तंत्र समजावून सांगितले.मंडाला कलेच्या सरावामुळे विद्याथ्यांची एकाग्रता, निरीक्षणशक्ती, संयम आणि कल्पनाशक्ती विकसित होण्यास मदत होते, असे प्रा. पंगाम यानी स्पष्ट केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने विविध आकर्षक मंडाला चित्रे साकारली. विद्याथ्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीला चालना देणारा हा उपक्रम विशेष ठरला.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या प्राचार्या सौ. राजश्री खैरनार यानी प्रमुख पाहुणे व व्याख्याते प्रा. प्रकाश पंगाम यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. यावेळी प्रमुख पाहुणे सुहास खैरनार, रोटरी क्लब ऑफ देवळालीचे अध्यक्ष रोटेरियन श्री. सुभाषचंद्र मोरे यांच्यासह रोटेरियनश्री. सुंदरमन, रोटेरियन श्री. मुरली, रोटेरियन श्री. रवि जैन, रोटेरियन श्री. अनिल सिंग, रोटेरियन कर्नल वाणीया, रॅन श्रीमती अथणी आणि रॅन श्रीमती उमासिंग आदी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. एम. ई. कुटे यांनी केले. त्यांनी विद्याथ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कलात्मक उपक्रमांचे महत्व विशद केले. विद्यार्थिनी जान्हवी रोकडे हिने आपले मनोगत व्यक्त केले, तर कुमारी रोशनी पवार हिने उपस्थित मान्यवर व आयोजकांचे आभार मानले.

Comments are closed.