

के. के. वाघ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या पुढाकाराने ९८ प्राध्यापकांचा गौरव
नाशिक, दि. ५ (प्रतिनिधी) : सरस्वती नगर येथील के. के. वाघ आर्टस्, कॉमर्स, सायन्स अँड कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त गौरव सोहळा व आरोग्यविषयक जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या पुढाकाराने महाविद्यालयातील प्राचार्यांसह एकूण ९८ प्राध्यापकांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून के. के. वाघ शिक्षण संस्थेचे सरस्वती नगर कॅम्पस समन्वयक व विश्वस्त डॉ. व्ही. एम. सेवलिकर, आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टचे आरोग्य विभाग सचिव प्रा. प्रकाश पांगम, तसेच आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या आरोग्य विभागाच्या सहसचिव व मानवता कॅन्सर हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. सुचेता गंधे वळसंगकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन, स्वागत व आयोजन अधिकारी प्रा. अर्चना कोते यांनी केले.

