

आषाढी एकादशी निमित्त आश्रय ट्रस्ट तर्फे बाल सदन अनाथ आश्रमातील १०० मुलांची मोफत आरोग्य व रक्ततपासणी.
आश्रय ट्रस्ट व ए.के. डायग्नोस्टिक लॅब यांचा संयुक्त उपक्रम; CBC, HIV व Blood Group तपासण्या संपन्न
नाशिक, दि. २५ जुलै २०२६ : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्ट यांच्या वतीने बाल सदन अनाथ आश्रम, त्र्यंबक रोड, नाशिक येथे १०० अनाथ मुला-मुलींसाठी मोफत आरोग्य व रक्ततपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा समाजोपयोगी उपक्रम आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्ट आणि ए.के. डायग्नोस्टिक लॅब, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या पार पडला.या शिबिरामध्ये एकूण १०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच CBC (Complete Blood Count), HIV व Blood Group या महत्त्वपूर्ण रक्ततपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमुळे मुलांच्या आरोग्यस्थितीचे प्राथमिक निदान होऊन आवश्यक वैद्यकीय सल्ला व पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.
