आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने वडगाव पिंगळा शाळेत आरोग्य तपासणी, थॅलेसेमिया जनजागृती व मंडला आर्ट कार्यशाळा उत्साहात.

समाज दिनानिमित्त विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व मंडला आर्ट कार्यशाळा संपन्न .
October 17, 2026
के. के. वाघ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या पुढाकाराने ९८ प्राध्यापकांचा गौरव
October 17, 2026

आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने वडगाव पिंगळा शाळेत आरोग्य तपासणी, थॅलेसेमिया जनजागृती व मंडला आर्ट कार्यशाळा उत्साहात.

वडगाव पिंगळा : दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्ट आणि ए. के. डायग्नोस्टिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, वडगाव पिंगळा येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगट तपासणी, अॅनिमिया व थॅलेसेमिया जनजागृती तसेच मंडला आर्ट कार्यशाळा असे तीनही कार्यक्रम एकत्रितपणे उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमांतर्गत शाळेतील तब्बल २८५ विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांची थॅलेसेमिया चाचणीही करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी कु. गौरी संतोष माळी हिच्या हस्ते करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्तेत सर्वाधिक गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तिच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून तिचा विशेष गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबरोबरच गुणवत्तेला आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Comments are closed.