

समाज दिनानिमित्त विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व मंडला आर्ट कार्यशाळा संपन्न .
नाशिक : दिनांक २०.८.२०२६ रोजी समाज दिनानिमित्त आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्ट आणि ए.के. डायग्नोस्टिक लॅब, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी, अॅनिमिया तपासणी तसेच मंडला आर्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत एकूण ४९० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. तपासणीचे अहवाल विद्यार्थ्यांना जागेवरच देण्यात आले. तसेच अॅनिमियाची तपासणी करण्यासाठी आवश्यक रक्तनमुने घेण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
