स्वातंत्र्यदिनानिमित्त क्रिएटिव्ह माईंड स्कूलमध्ये देशभक्तीचा जागर

श्रीमती गार्डा बालसदन येथे मंडाला आर्ट कार्यशाळा संपन्न.
October 17, 2026
समाज दिनानिमित्त विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व मंडला आर्ट कार्यशाळा संपन्न .
October 17, 2026

आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या सहकार्याने रक्तदान शिबिर

नाशिक : क्रिएटिव्ह माईंड स्कूलमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्ट, ठाणे यांच्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातूनरक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्ट, ठाणेचे आरोग्य सचिव प्रा. प्रकाश पांगम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला सुधाकर बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती अरुणा जठार, सुधाकर आय क्लिनिकच्या अध्यक्षा प्राजक्ता जठार, सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव श्री.सुनील जठार तसेच उत्कृष्ट कवयित्री, लेखिका व अभिनेत्री अनुराधा धोंडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

Comments are closed.