


आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्टच्या पुढाकारातून उपक्रम; मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
त्र्यंबकेश्वर : आशीर्वाद सेवाधाम ट्रस्ट संचलित श्रीमती गार्डा बालसदन, खंबाळे, त्र्यंबकेश्वर येथे ७ ऑगस्ट २०२६ रोजी मंडाला आर्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्टचे आरोग्य विभाग सचिव डॉ. प्रकाश पांगम, डॉ. रवी कुलकर्णी, वृषाली सोनवणे आणि विद्या शार्दुल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा घेण्यात आली.