

दिनांक २४.०३.२०२४ रोजी थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियानाला अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी आश्रय ट्रस्टचे संस्थापक डॉ. दीपक मोरेश्वर नाईक आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस अँडव्हॉकेट नितीन ठाकरे यांच्यात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. या कराराद्वारे थॅलेसिमिया जनजागृती, चाचण्या, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय यांसाठी दोन्ही संस्थांमध्ये सहकार्य होणार आहे. या सामंजस्य करारामध्ये मराठा विद्या प्रसारक संस्थेचे पूर्व प्राथमिक, मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, आश्रम शाळा, माध्यमिक शाळा, मराठी माध्यम, माध्यमिक शाळा, इंग्रजी माध्यम. उच्च माध्यमिक विद्यालय, मराठी माध्यम, अध्यापक, विद्यालय, शिक्षण शास्त्र महाविद्यालय, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज, बॅचलर ऑफ डिझाईन, तसेच नर्सिंग कॉलेज, व्यवस्थापना संस्था , मविप्रचे प्रशिक्षण व विकास केंद्र, आयटीआय, मेडिकल कॉलेज, शेतकी शाळा, विद्यार्थी वस्तीगृह, मेडिकल कॉलेज, परिचारिका प्रशिक्षण, महाविद्यालय असे एकूण ४९९ उपक्रमाचा सहभाग करण्यात आला. 
