

महिलांनी आर्थिक दृष्ट्या व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम बनावे- सीए प्रसन्न पांगम
नाशिक – ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिन गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, नाशिक येथे साजरा करण्यात आला. आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे यांचे शैक्षणिक विभाग सचिव सीए प्रसन्न पांगम यांनी महिला दिनानिमित्त आर्थिक बचत व महिलांचे आर्थिक सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा आर.व्ही.पवार प्रमुख अतिथी प्रोफेसर प्रकाश पांगम आरोग्य विभाग सचिव आश्रय ट्रस्ट ठाणे, योगशिक्षिका श्रीमती ऋतुजा मसरानी, महिला सबलीकरण समितीच्या प्रमुख डॉ. एस एस पाटील, ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे अधिकारी सुभेदार केशव केदार हवालदार निलेश मेंगावडे , लेफ्टनंट संदीप भिसे हे उपस्थित होते. कुटुंबातील आर्थिक प्रश्न सोडवताना महिलांना विशेष आर्थिक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न कुटुंबाच्या गरजा , त्यातून होणारी बचत. या बचतीतून दीर्घ, मध्यम व अल्पकाळासाठी होणारी गुंतवणूक कशी करायची याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.