

गुरु नेहमीच शिष्याच्या उज्वल भविष्याचा विचार करत असतो-आमदार सत्यजित तांबे.
सिन्नर:- विद्यार्थ्यांनी नेहमीच गुरु शिष्याच्या उज्वल परंपरेची जोपासना करावी, व आयुष्यभर गुरु विषयक कृतज्ञता जोपासावी. गुरुने दिलेला सल्ला विद्यार्थ्यांनी अमलात आणला तर त्याच्या आयुष्याचे नेहमी सोने होते.मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला व भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर तसेच सोशल राइट्स फाउंडेशन ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक श्रीकृष्णाजी भगत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी केले. गुरु हा परिसापलीकडचा असतो तो नेहमीच विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे सोने व्हावे व त्याच्या कल्याणाचा विचार करत असतो असे प्रास्ताविकात मांडले.