

आनंदी आणि निरोगी जीवनासाठी योग अत्यावश्यक – प्राचार्य डॉ. एन. यू. पाटीलसिन्नर | २१ जून २०२५: गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर आणि आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रस्थान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात १६ जून ते २१ जून या कालावधीत ‘पूर्व योग प्रशिक्षण कार्यशाळा २०२५’ आयोजित करण्यात आली होती.
