

मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक– गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर व आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकादमी मधील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान शुक्रवार दिनांक २७ जून २०२५ रोजी आयोजित केले होते.
सिन्नर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य करिअर कट्टा या विभागाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी मंजूर केली आहे. या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नियमितपणे मैदानी सराव लेखी चाचण्या लेक्चर्स व मार्गदर्शन व्याख्याने घेतली जातात.
