सिन्नर महाविद्यालयात थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र कार्यशाळा संपन्न.

राज्यस्तरीय थॅलेसिमीया मुक्त महाराष्ट्र अभियानाला सुरुवात.
August 22, 2025
थँलेसेमिया जागृती या विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम गिरणारे येथे संपन्न झाला.
August 23, 2025

आश्रय सामाजिक, सांस्कृतिक,  व शैक्षणिक ट्रस्ट ठाणे आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी थॅलेसेमिया ह्या आजाराबाबत जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली. ‘थॅलेसेमिया फ्री महाराष्ट्र’ हे ब्रिद वाक्य घेऊन अवघ्या महाराष्ट्राला या आजाराबद्दल जागृत करणे हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते. आश्रय ट्रस्ट व मराठा विद्या प्रसारक समाजाचे सिन्नर महाविद्यालय यांच्यामध्ये समन्वय कराराच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन झालेले आहे.

Comments are closed.