

दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध असून यामध्ये सीए, आय.सी. डब्ल्यू.ए, सी.एम.ए, बँकिंग, इन्शुरन्स, वित्त, व्यवस्थापन, प्रशासन, विपणन व विक्रयकला, अंकेशन(audit) सेक्रेटरील प्रॅक्टिस, गुंतवणूक, शेअर मार्केट, शिक्षण, व्यापार, जाहिरात, वकिली, प्रोजेक्ट व्यवस्थापन यासारख्या असंख्य संधी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध असल्याचे प्रतिपादन सीए प्रसन्न पांगम यांनी केले. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी या कार्यक्रमात मराठा विद्या प्रसारक समाज गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे आश्रय सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक ट्रस्ट ठाणे आणि सिन्नर महाविद्यालय वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाणिज्य मंडळ उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.