भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित.

आश्रय सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट, ठाणे व गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला महाविद्यालय सिन्नर यांच्यामध्ये सामंजस्य करार .
August 21, 2025
‘एक झाड आईसाठी’ मोहीम उत्साहात
August 21, 2025

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट च्या वतीने रत्नागिरी येथील कुळये वाडी येथे सोमेश्वर क्रिकेट मंडळ यांच्या सहयोगाने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित. (21.06.2024)

 

या स्पर्धेचे नियोजन कुळयेवाडी ग्रामविकास संस्थेने केले होते. यासाठी आश्रय ट्रस्टच्या वतीने सर्व संघाला टी शर्ट देण्यात आले. या स्पर्धेत अनेक गावा गावातून खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना आश्रय ट्रस्ट च्या  शैक्षणिक विभागाने निती आयोग प्रमाणित सर्टिफिकेट देण्यात आले. येणाऱ्या मान्यवरांना आश्रय सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. गावातील मुलांना याचा आनंद मिळावा व मैदानी खेळ प्रत्येकाने खेळले पाहिजेत हि संकल्पना ट्रस्टचे विश्वस्त डॉ. दिपक मोरेश्वर नाईक यांनी दिली होती.  या सर्व कार्यक्रमांचे नियोजन कुळये वाडी चे अध्यक्ष अनिल कुळये व सर्व कुळये वाडी ग्रामस्थ यांनी केले.

त्याचप्रमाणे प्राथमिक शाळा मुसलोंडी या शाळेत आश्रय ट्रस्ट च्या वतीने संकणक देण्यात आले. ग्रामीण भागात याची खूप गरज आहे . अजूनही शाळेत संगणक नाहीत यासाठी आश्रय ट्रस्ट अश्या शाळेंना संगणक वाटप करतात.

Comments are closed.