

दिनांक ३०.११.२०२४ – नाशिक रोड येथे थॅलसेमिया चाचणी केंद्राची स्थापना एके डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज, नाशिक आणि आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट, भाईंदर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “थॅलसेमिया ॲनिमिया स्क्रीनिंग आणि तपासणी केंद्र” या नावाने सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन डॉ. दीपक मोरेश्वर नाईक यांच्या हस्ते झाले.