

पुणे – थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियान संपूर्ण राज्यभर प्रभावीपणे राबवणाऱ्या आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट या सेवाभावी संस्थेला जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून एक महत्त्वपूर्ण उपकरण – सेल काउंटर – भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले आहे. या उपकरणाची अंदाजे किंमत रु. ३.५ लाख असून, हे उपकरण थॅलेसिमिया निदानासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.ही देणगी मिळवुन देण्यात राष्ट्रीय अध्यक्ष जनकल्याण रक्तपेढी परिवार समिती भारत अध्यक्ष पॅथॉलॉजिस्ट प्रा. डॉ. दिलीप बाळकृष्ण वाणी (एम.डी.) यांची प्रमुख भूमिका राहिली आहे. त्यांच्या प्रयत्नांनी आणि डी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील पॅथॉलॉजिस्ट डॉ. पद्मजा कानिटकर यांच्या अमूल्य सहकार्यामुळे ही वस्तुनिष्ठ आणि अत्यावश्यक मदत ट्रस्टला प्राप्त झाली.
