

सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आश्रय ट्रस्टच्या वतीने गरीब व झोपडपट्टी भागातील मुलांसाठी थॅलेसिमिया जनजागृती व तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे नेतृत्व आश्रय ट्रस्टचे आरोग्य सचिव प्रोफेसर प्रकाश पांगम यांनी केले, तसेच ट्रस्ट च्या संपूर्ण टीमने यात सक्रिय सहभाग घेतला.