आश्रय ट्रस्ट ठाणे यांची थॅलेसेमिया मुक्त अभियान याची मोठ्या प्रमाणात कार्यशाळा संपन्न .

गुजरात मध्ये थॅलेसिमिया मुक्त गुजरात उपक्रमाची दमदार सुरुवात.
October 7, 2025
महिला दिनानिमित्त आर्थिक बचत व महिलांचे आर्थिक सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन.
October 7, 2025

थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र या मोहिमेत पुण्यातील  ओम ग्रामण्ये इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन एक्सलन्स, श्री एल.जी.पाटील ट्रस्ट पुणे व संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स पुणे या संस्थांचा  पुढाकार .

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे या संस्थेने महाराष्ट्र राज्य  थॅलेसेमिया मुक्त करण्याचे अभियान हाती घेतले आहे.

थॅलेसेमिया मुक्त अभियान हा उपक्रम  आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे व मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहामध्ये १९ जानेवारी २०२५ रोजी या राज्यस्तरीय परिषदेतून सुरुवात झाली. या परिषदेसाठी पुण्यातील ओम ग्रामण्ये इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन एक्सलन्स धायरी पुणे, श्री एल.जी.पाटील ट्रस्ट पुणे व संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स पुणे या संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने या परिषदेत सहभागी होण्यासाठी पाठविले.या संस्थांच्या विद्यार्थ्यांची या परिषदेतील उपस्थिती महत्त्वाची राहिली व त्याच वेळी या संस्थांनी थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र या अभियानात सहभागी होण्याचे ठरविले.

त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ०१.०३.२०२५ रोजी आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे यांचे संस्थापक डॉक्टर दीपक मोरेश्वर नाईक, संस्थापक सचिव सौ प्रीती दीपक नाईक, आरोग्य विभाग सचिव प्रोफेसर प्रकाश पांगम , यांच्या उपस्थितीत श्री. शिवराम चव्हाण ,डायरेक्टर ओम ग्रामण्ये इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन एक्सलन्स पुणे, सौ अल्पिता स्वप्निल पाटील श्री .एल.जी.पाटील ट्रस्ट पुणे व संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स पुणे यांच्या प्राचार्य डॉक्टर मीनल गुजराथी यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या.

Comments are closed.