

निफाड : दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी आश्रय ट्रस्टच्या वतीने श्रीराम क्लासेस, निफाड येथे भव्य थॅलेसेमिया जनजागृती व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थी व पालक मिळून हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला.या शिबिराचे उत्कृष्ट नियोजन ट्रस्टचे कार्यकर्ते श्री. उल्हास दिगंबर पाटील व सौ. सविता पाटील यांनी केले.या कार्यक्रमात थॅलेसेमिया या गंभीर रक्तविकाराविषयी जागृती निर्माण करण्यासाठी प्रा. प्रकाश पांगम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्याचप्रमाणे आश्रय ट्रस्ट च्या या उपक्रमात डॉ. प्राजक्ता जठार यांनी सहभाग घेतला व मोफत डोळे तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप केले आहे.